Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘डिनो मोरियाशी घनिष्ठ मैत्री, मिठी सफाई घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 06:34 IST

शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांची मागणी

मुंबई : मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून याप्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

निरुपम म्हणाले की, गेल्या २० वर्षांत १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत उद्धवसेनेची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही. मिठी नदी नालेसफाई घोटाळ्यातही आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे, कारण दोघे जवळचे मित्र आहेत. 

टॅग्स :आदित्य ठाकरेसंजय निरुपम