आंतरराष्ट्रीय विमान प्रवास गेल्या वर्षभरात दोन ते तीन पटीने महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:22 AM2019-12-04T00:22:26+5:302019-12-04T00:27:22+5:30

सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेले दिल्ली ते पॅरिस आणि मुंबई ते लंडन हे दोन आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत.

International air travel was two to three times more expensive in the last year | आंतरराष्ट्रीय विमान प्रवास गेल्या वर्षभरात दोन ते तीन पटीने महागला

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास गेल्या वर्षभरात दोन ते तीन पटीने महागला

Next

मुंबई : गेल्या एक वर्षात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास दोन ते तीनपट महाग झाला आहे. गेल्या एप्रिलमध्ये जेट एअरवेज बंद झाल्यानंतर तिकीट दर झपाट्याने वाढले आहेत. 
सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेले दिल्ली ते पॅरिस आणि मुंबई ते लंडन हे दोन आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये
दिल्ली - पॅरिसचे विमान तिकीट ४० हजार २० रुपये होते. ते एक वर्षात वाढून जवळपास तीनपट म्हणजे १ लाख १४ हजार ६४२ झाले आहे, मुंबई - लंडनचे विमान तिकीट ५३ हजार रुपयांवरून आता १ लाख २३ हजार ०२१ रुपये इतके झाले आहे. काही प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांच्या विमान तिकिटात झालेली वाढ तक्त्यात दाखवली आहे.

आंतरराष्ट्रीय तिकीट दर
मार्ग डिसें.२०१८ डिसें.२०१९
दिल्ली-पॅरिस ४०,०२० १,१४,६४२
मुंबई - लंडन ५३,०४१ १,२३,०२१
मुंबई - अ‍ॅमस्टरडॅम ३५,७४५ ७२,५३९
दिल्ली - न्यूयॉर्क ५८,०३४ १,५८,४०६
दिल्ली - लंडन ५१,२६० ७४,७४२
मुंबई - सॅनफ्रान्सिस्को ७२,५१४ १,१२,७६८

Web Title: International air travel was two to three times more expensive in the last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई