भाजपा नेते भालचंद्र शिरसाट यांना अंतरिम दिलासा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:29 IST2020-10-28T00:29:04+5:302020-10-28T00:29:38+5:30

Bhalchandra Shirsat News : भाजपचे भालचंद्र शिरसाट यांचे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला, तरी उच्च न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर रोजी दिलेला अंतरिम दिलासा काही काळ कायम ठेवला.

Interim consolation to BJP leader Bhalchandra Shirsat | भाजपा नेते भालचंद्र शिरसाट यांना अंतरिम दिलासा कायम

भाजपा नेते भालचंद्र शिरसाट यांना अंतरिम दिलासा कायम

मुंबई : भाजपचे भालचंद्र शिरसाट यांचे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला, तरी उच्च न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर रोजी दिलेला अंतरिम दिलासा काही काळ कायम ठेवला. त्यामुळे आणखी काही काळ ते स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम पाहू शकतील.
पालिकेने शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करत त्यांच्या जागी अन्य पात्र नगरसेवकाची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्तीच्या कार्यवाहीचे आदेश दिले. पालिकेच्या या निर्णयाला शिरसाट यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. एस. जे. काथावाला व न्या. व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठापुढे होती. 
 

Web Title: Interim consolation to BJP leader Bhalchandra Shirsat