म्हाडा सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:33 AM2020-07-09T06:33:40+5:302020-07-09T06:34:00+5:30

मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

Interest free extension till December 15 to pay sale price of MHADA flat, decision on corona background | म्हाडा सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

म्हाडा सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Next

मुंबई : म्हाडाच्यामुंबई व कोकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मंडळाने काढलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे ७०० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना तसेच कोकण मंडळातर्फे सन २०१४, २०१६ व २०१८ मध्ये काढलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे १००० यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
कोरोना प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा विहित वेळेत करता आला नाही. त्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
 
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Interest free extension till December 15 to pay sale price of MHADA flat, decision on corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app