अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:20 PM2020-04-04T20:20:58+5:302020-04-04T20:21:47+5:30

रविवारी रात्री ९ वाजता : फक्त घरातले दिवे बंद करण्यात यावे

Instructions for urgent measures to maintain uninterrupted and secure electricity supply | अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश

अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी ५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता देशातील घरातील विजेचे दिवे बंद करून नऊ मिनिटांकरिता मेणबत्त्या, दिवे व मोबाईल टॉर्च लावण्यास जनतेला सांगितले आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड टाळण्यासाठी राज्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा वि•ाागाचे प्रधान सचिव यांना दिले आहेत.

विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता ऊर्जा वि•ााग, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व राज्य •ाार प्रेषण केंद्र यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांच्या वरीष्ठ अधिका-यांना तातडीने निर्देश देण्यात यावेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पथदिवे, घरगुती उपकरणे जसे टि.व्ही., संगणक, फ्रिज आणि एअर कंडिशनर हे बंद करण्यात येणार नाहीत. फक्त घरातले लाईट/दिवे बंद करण्यात यावे, असे राऊत यांनी म्हटले आहे.  एखादी आकस्मिक परिस्थिती उद•ावल्यास महाराष्ट्रातील २५८५  मेगावॅट स्थापित वीज क्षमतेच्या जलविदयुत केंद्रातून वीज निर्मिती करता येईल, जेणेकरून उद•ावलेल्या परिस्थतीत पश्चिम ग्रीडचे संतुलन राखणे सुकर होईल, असे राऊत यांनी सांगितले.
 

Web Title: Instructions for urgent measures to maintain uninterrupted and secure electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.