निलंबनाऐवजी प्रवक्तेपद काढून राम कदमांना अभय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 06:26 IST2018-09-07T06:26:28+5:302018-09-07T06:26:43+5:30
महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना पक्षातून निलंबित करण्याऐवजी त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

निलंबनाऐवजी प्रवक्तेपद काढून राम कदमांना अभय!
मुंबई : महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना पक्षातून निलंबित करण्याऐवजी त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी कदम यांना गुरुवारी बोलावले होते. ‘त्या’ विधानाविषयी कदम यांची भूमिका त्यांना समजून घ्यायची होती. पण कदम यांनी भेटीला न जाता, फोनवरून खुलासा केला. बाहेर गेलो तर लोकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, या भीतीने ते भेटीला गेले नाहीत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कदम यांच्यावर कारवाईबाबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चाही केल्याचे समजते. पक्षातून हकालपट्टीऐवजी त्यांना दोन दिवसांत प्रवक्तेपदावरून दूर केले जाईल, असे दिसते.