Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा काँग्रेस संपविण्याचा डाव - संजय निरूपम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 07:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला.

 मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला.संपुआचे नेतृत्व शरद पवारांकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त गुरुवारी राजकीय वर्तुळात होते. या पार्श्वभूमीवर निरूपम यांनी ट्विटरद्वारे मत मांडताना षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात एक मोहीम सुरू आहे. शरद पवारांना संपुआचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याच्या वावड्या याच मोहिमेचा एक भाग आहे. याच मोहिमेंतर्गत काही दिवसांपूर्वी २३ काँग्रेस नेत्यांनी सह्यांचे पत्र पाठविले होते. काँग्रेसला संपविण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्यानुसार, हे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपम