Diwali 2025: दिवाळीत महागाईची ‘आतषबाजी’; फटाक्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:03 IST2025-10-18T14:03:11+5:302025-10-18T14:03:11+5:30

Diwali 2025 Firecrackers Price Surge: ठिकठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची होतेय गर्दी 

Inflationary 'fireworks' during Diwali; Prices of firecrackers increased by 20 to 25 percent | Diwali 2025: दिवाळीत महागाईची ‘आतषबाजी’; फटाक्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले

Diwali 2025: दिवाळीत महागाईची ‘आतषबाजी’; फटाक्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले

सचिन लुंगसे -

मुंबई : दिवाळीत यंदा फटाक्यांनाही महागाईची झळ बसली आहे. फटाक्यांच्या किमतीमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, किमती वाढल्यानंतरही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. फटाक्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले. 

आवाज करणाऱ्या फटाक्यांसोबत आकाशात उंच जाऊन रोषणाई करणाऱ्या फटाक्यांना जास्त मागणी आहे. मुंबईत तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणावर फटाके येतात. दक्षिण भारतामध्ये या वर्षी गेल्या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फटाक्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. कच्चा माल तयार करणे तसेच फटाके बनविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे दिवाळीपर्यंत अपेक्षित फटाक्यांची निर्मिती झाली नाही. परिणामी, दरवर्षीप्रमाणे फटाक्यांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. साहजिकच फटाक्यांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. मशीद बंदर, कुर्ला,  मालाड येथील फटाके विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. शनिवारी, रविवारीही फटाक्यांची चांगली विक्री होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

आपटी, रस्सी बॉम्ब हिट 
आपटी बॉम्ब, फुलबाजे, पाऊस, चक्र या छोट्या मुलांच्या फटाक्यांना अधिक मागणी आहे. 
रस्सी बॉम्बसारख्या मोठ्या फटाक्यांच्या खरेदीकडेही लोकांचा कल आहे.
रॉकेटसारख्या आकाशात उंच जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांची दरवर्षीप्रमाणे चांगली विक्री होत आहे. 
वेगवेगळ्या रंगांमध्ये फुटणारे आणि शॉट्स म्हणून ओळखले जाणारे फटाकेही पसंतीस उतरत आहेत.
लहान मुलांच्या आवडीच्या पॉप-पॉप फटाक्याला चांगली मागणी आहे.

जीएसटीमुळे फटाक्यांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दिवाळीतच आम्हाला चार चांगले पैसे मिळतात. कारागीर, दुकानाचे भाडे, लाइट बिल, वाहतूक या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय सांभाळावा लागतो. 
राहुल घोणे, फटाके विक्रेते

...या फटाक्यांचे आकर्षण 
ब्ल्यू बेरी, किंग, फूटबॉल डबल धमाका, थ्री साउंड रॉकेट, वंडरफुल हेव्हन ६० शॉट्स, अँग्री बर्ड्स, ट्विकल स्काय, इंडियन किंग, किटकॅट, कलर साउंड असे अनेक फटाके बाजारात उपलब्ध आहेत.

फटाके का महागले ?
फटाक्यांची वात तयार 
करणाऱ्या नागपूर येथील कारखान्याला आग लागली होती. त्यामुळे फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. वातेची किंमत वाढल्याने फटाके महाग झाले आहेत. 
तामिळनाडूमधील शिवकाशी येथे अतिवृष्टी झाली. यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या.
फटाके सुकविण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र, तामिळनाडूत पाऊस असल्याने फटाके सुकविण्यात अडचणी आल्या. 

Web Title : दिवाली पर महंगाई की मार: पटाखों के दाम 20 से 25% बढ़े

Web Summary : तमिलनाडु में बारिश और जीएसटी के कारण दिवाली के पटाखों की कीमतें 20-25% बढ़ीं। कीमत बढ़ने के बावजूद, मुंबई के बाजारों में ध्वनि और प्रकाश प्रदर्शन, खासकर रॉकेट और बच्चों के पसंदीदा पटाखों की मांग अधिक है।

Web Title : Diwali firecrackers price hike: Inflation sparks 'fireworks' this festive season.

Web Summary : Diwali firecracker prices surge 20-25% due to production dips from Tamil Nadu rains and GST. Despite cost, demand remains high in Mumbai markets for sound and light displays, especially rockets and children's favorites.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.