Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 06:31 IST2025-12-04T06:30:00+5:302025-12-04T06:31:09+5:30
Indigo flights cancelled: देशात व परदेशात मिळून इंडिगोच्या दिवसाकाठी २,३०० फेऱ्या होतात.

Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
मुंबई : देशातील अनेक विमानतळांच्या संगणकीय प्रणालीमध्ये एकीकडे तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे विमान सेवेला फटका बसलेला असतानाच दुसरीकडे इंडिगो कंपनीच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कंपनीची १०० पेक्षा जास्त विमाने रद्द झाली. त्याचा मोठा फटका इंडिगोच्या प्रवाशांना बसला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडल्यामुळे बुधवारी दिवसभरात इंडिगोची १०० पेक्षा जास्त विमाने रद्द झाली. त्यातच ही गोंधळाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी ४८ तास लागू शकतात. देशात व परदेशात मिळून इंडिगोच्या दिवसाकाठी २,३०० फेऱ्या होतात.
मात्र, कंपनीने जारी केलेल्या निवेदनामध्ये नेमकी कशामुळे ही परिस्थिती उद्भवली याचा उल्लेख न करता, काही अपरिहार्य कारणांमुळे आमच्या सेवेला फटका बसल्याचे सांगितले. या प्रकरणी इंडिगोने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतानाच आमची सेवा पूर्ववत होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले आहे.