“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 23:15 IST2025-09-20T23:14:32+5:302025-09-20T23:15:18+5:30

Indian Railway Minister Ashwini Vaishnaw: नव्या मुंबई लोकलमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे प्राणवायूचे प्रमाण अधिक असेल, असेही म्हटले जात आहे.

indian railway minister ashwini vaishnaw said that now mumbai local to get 238 new rakes and local trains with automatic doors in the new year | “२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 

“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 

Indian Railway Minister Ashwini Vaishnaw: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलबाबत अनेक स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईकरांना होत असलेला त्रास, लोकल फेऱ्या वाढवण्यास येत असलेल्या मर्यादा, मुंबई लोकलने प्रवास करताना वाढत चाललेले अपघात यांसारख्या विषयांवर सरकारकडून काही पावले उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल आणणे, सर्व एसी लोकल करणे यावर काम सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,  नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावेल. मुंबईतील सध्या धावत असलेल्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. तर, येत्या काळात २३८ नवीन रेक दाखल होणार असून, त्यामुळे ६० टक्के प्रवासी क्षमता वाढेल.

वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे नव्या लोकल?

देशभरातून नागरिक मुंबईत नोकरीनिमित्त येतात. मुंबईच्या अर्थव्यवस्थेत आपले आर्थिक योगदान देतात. परंतु, दरवर्षी अनेक प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील. वातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. आता नवीन तयार होणाऱ्या सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. स्वयंचलित दरवाजांमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात पूर्णपणे बंद होतील. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे नव्या लोकलमध्ये प्राणवायूचे प्रमाण अधिक असेल, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. 

दरम्यान, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या मुंबई लोकलच्या नवीन रेकमध्ये पहिल्या डब्यामध्ये चढल्यानंतर शेवटच्या डब्यापर्यंत जाता येईल, अशा प्रकारची संरचना करण्यात येणार आहे. तसेच, सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविल्यानंतर, सामान्य लोकलचे डबे एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यामध्ये जाणे शक्य होईल. यामुळे गर्दी विभाजित करणे शक्य होईल. सध्या वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडलेले आहेत, असे समजते.

 

Web Title: indian railway minister ashwini vaishnaw said that now mumbai local to get 238 new rakes and local trains with automatic doors in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.