India vs South Africa : Rohit Sharma to lead Board President's XI against SA in the practice game | India vs South Africa : रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ!
India vs South Africa : रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ!

मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. खराब फॉर्माशी झगडत असलेल्या लोकेश राहुलला डच्चू देत निवड समितीनं युवा फलंदाज शुबमन गिलला संधी दिली. त्यात राहुलच्या अनुपस्थितीत हिटमॅन रोहित शर्मा कसोटीत प्रथमच सलामीला मैदानावर उतरणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ सराव सामना खेळणार आहे आणि त्या सामन्यात अध्यक्षीय एकादश संघाचे नेतृत्व रोहित सांभाळणार आहे. 

अध्यक्षीय एकादश संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, एआर इस्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भरत( यष्टिरक्षक), जलज सक्सेना, डी जडेजा, आवेश खान, इशान पोरेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव. 


कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

Web Title: India vs South Africa : Rohit Sharma to lead Board President's XI against SA in the practice game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.