Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:23 IST2025-05-09T14:22:17+5:302025-05-09T14:23:24+5:30

Mumbai Tata Memorial Hospital Bomb Threat: मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

India-Pak Tensions; Mumbai Tata Memorial Hospital Receives Threat Email | Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल

Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. रुग्णालय प्रशासनाला धमकी इमेल आला. यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल झाले असून शोध मोहीम राबवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाला शुक्रवारी पहाटे हा धमकीचा ईमेल आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन प्रोटोकॉलचे पालन करून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घेण्यात आली. दरम्यान, बॉम्ब शोधक पथक मुंबई पोलिसांची मोठी तुकडी रुग्णालयात दाखल झाली. अधिकारी ईमेल कुठून आणि कोणी पाठवला, याचा तपास सुरू आहे. लवकरच हा ईमेल पाठवणाऱ्याला ताब्यात घेतले जाईल, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात गस्त वाढवली आहे.

Web Title: India-Pak Tensions; Mumbai Tata Memorial Hospital Receives Threat Email

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.