Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडीची मुंबईत उद्या पदयात्रा; वर्षा गायकवाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 06:16 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी २ ऑक्टोबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे.

मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी २ ऑक्टोबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेनिमित्ताने ‘मीपण गांधी’ हा नारा देताना गांधीजींचे प्रेम, सद्भावना, शांतता हे विचार जनमानसात पोहोचविले जाणार आहेत. त्याचबरोबर ‘फोडा आणि राज्य करा’ या इंग्रजांच्या नीतीचे राजकारण करणाऱ्या भाजपचा निषेध केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी  शनिवारी दिली.

ही पदयात्रा २ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता सुरू होणार असून, मेट्रो सिनेमा, हुतात्मा चौक ते रिगल सिनेमा येथून मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत जाईल. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेत बेकायदा कब्जा करून कार्यालय थाटले. विधानसभेत आम्ही आवाज उठवला; मात्र, आता रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेस