पावसाचे प्रमाण वाढले; प्रदूषण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:47 PM2020-06-13T18:47:18+5:302020-06-13T18:47:45+5:30

बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवले तर प्रदूषण नियंत्रित राहण्यास मदत होईल

Increased rainfall; Pollution decreased | पावसाचे प्रमाण वाढले; प्रदूषण घटले

पावसाचे प्रमाण वाढले; प्रदूषण घटले

Next

 

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी जगभरात, देशभरात आणि मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रदूषण करणारे घटक निष्क्रिय झाले. परिणामी ठिकठिकाणी हवा स्वच्छ नोंदविण्यात येऊ लागली. मुंबईतदेखील ब-यापैकी प्रदूषणाचे प्रमाण घटले. यात घट नोंदविण्यात येत असतानाच मुंबईत सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. परिणामी हवेतील प्रदूषित घटक खाली बसले; आणि हवामान ब-यापैकी स्वच्छ झाले. दरम्यान, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे बंद असल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. मागील दहा वर्षाचा विचार करता वातावरण प्रदूषण वाढीस मोठया प्रमाणावर जबाबदार असलेले बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवले तर प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.


वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान केशभट हे मुंबई महागर प्रदेशातील प्रदूषणासह राज्य आणि देशभरातील प्रदूषणाचा अभ्यास करत आहेत. याबाबत केशभट यांना विचारले असता त्यांनीदेखील पावसामुळे प्रदूषणात घट झाल्याचे सांगितले. पावसाचे प्रमाण वाढले की हवेतील प्रदूषक खाली बसतात. त्यामुळे हवा स्वच्छ नोंदविण्यात येते. लॉकडाऊनमुळे देखील प्रदूषण कमी झाल्याचे केशभट यांनी सांगितले. कोरोनाला हरविण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आले  असून, या लॉकडाऊनमुळे मुंबईमधील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण घटल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महापालिकेनेही वायु वैविध सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत तयार केलेला वायूप्रदूषण पातळीबाबतचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यांत मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषित ठिकाणांची हवादेखील समाधानकारक नोंदविण्यात आली आहे.

........................................

 

  • - मुंबई महापालिकेने जानेवारी ते मे या महिन्यादरम्यानच्या हवेची गुणवत्तेची पातळी मोजली आहे.
  • - चेंबूर, भांडुप, बाकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी आणि बोरीवली येथील हवेची नोंद करण्यात आली आहे.
  • - जानेवारी महिन्यात या सर्व ठिकाणी हवेत तंरगणा-या धुळीकणांचे प्रमाण १५० पार्टीक्युलेट मॅटरच्या आसपास होते.
  • - हवेतील धूळीकणांचे प्रमाण मे महिन्यात थेट ५० पार्टीक्युलेट मॅटर एवढे खाली घसरले.
  • - याचाच अर्थ मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावला होता.

 

........................................

  • - जानेवारी महिन्यात मुंबईच्या बहुतांशी भागात हवेचा दर्जा वाईट, अतिशय वाईट आणि मध्यम नोंदविण्यात आला होता.
  • - फेब्रूवारी महिन्यातदेखील सरासरी प्रमाण हेच राहिले.
  • - मार्च महिना देखील हवेच्या गुणवत्तेच्या दर्जाबाबत निराशाजनकच राहिला.
  • - एप्रिलमध्ये मात्र हवेचा दर्जा सुधारु लागला.
  • - बहुतांशी ठिकाणी म्हणजे भांडुप, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, माझगाव येथे हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला.
    • - मे महिन्यात देखील याच ठिकाणी हवेचा दर्जा मध्यम, समाधानकारक  राहिला.

Web Title: Increased rainfall; Pollution decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.