Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 06:50 IST

शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आंतरवासिता कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल महाविद्यालयातील इंटर्न्सच्या विद्यावेतनात वाढ व्हावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी करत होते. अखेर यावर्षी सरकारने पदवी आणि पदव्युत्तर फिजिओथेरपीच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आंतरवासिता कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे.

पदवी फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल महाविद्यालयातील इंटर्न्सना दरमहा एक हजार ७५० रुपये विद्यावेतन  मिळत होते. 

आता त्यांना या वर्षीपासून आठ हजार रुपये मिळणार आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन  देण्यात येत होते, त्यांना यापुढे १० हजार रुपये देण्यात येणार आहे. 

तसेच बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता कालावधीत यापुढे आठ हजार रुपये विद्यावेतन देण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनात यापूर्वी तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. मात्र,  फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल महाविद्यालयातील इंटर्न्सच्या विद्यावेतनात अनके वर्षे वाढ करण्यात आली नव्हती. 

टॅग्स :आरोग्यमहाराष्ट्र