अभियांत्रिकी, फार्मसीच्या नोंदणीत वाढ; प्रवेशनिश्चितीसाठी चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:29 AM2021-01-03T06:29:55+5:302021-01-03T06:30:12+5:30

जागा भरण्यासाठी अभ्यासक्रम नियमन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत

Increase in engineering, pharmacy registration; Churas for admission | अभियांत्रिकी, फार्मसीच्या नोंदणीत वाढ; प्रवेशनिश्चितीसाठी चुरस

अभियांत्रिकी, फार्मसीच्या नोंदणीत वाढ; प्रवेशनिश्चितीसाठी चुरस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए आणि इतर अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी सीईटी सेलने दिलेली ३१ डिसेंबरची मुदत अखेर संपली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकी, फार्मसी सर्वच अभ्यासक्रमांना नोंदणी करणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवेश निश्चितीसाठी चुरस निर्माण हाेईल, असे मत तज्ज्ञांनी मांडले.


अभियांत्रिकीसाठी यंदा १ लाख १८ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी ८७ हजार २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमसीएसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार २५८, तर एमबीएसाठी अर्ज करणारी विद्यार्थ्यांची संख्या ५५ हजार १८१ इतकी आहे.
त्यामुळे यंदा प्रवेशासाठीची स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यवस्थापन क्षेत्रासाठी झालेल्या नोंदणीची संख्याही यंदा उत्तम आहे. अभियांत्रिकी राज्यात १४ हजार जागा कमी झाल्या आहेत तर फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने याच्या जागा वाढल्या आहेत. 


मात्र उपलब्ध जागांवर प्रवेश निश्चितीसाठी अर्जाची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने अजूनही विद्यार्थी अभियांत्रिकीलाही महत्त्व देत असल्याचे मत काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.


अभ्यासक्रम - नोंदणी 
केलेले विद्यार्थी 

(२ जानेवारी रोजीची माहिती)
nएमबीए - ५५, १८१
nबीइ / बीटेक - १, १८, ३९०
nबी फार्मसी - ८७,२०५
nएम ई / एम टेक - १० ७१४
nएमसीए - १२२५८
nएम फार्मसी - ६१४४
nबी आर्किटेक्चर - ८८७०
nएम आर्किटेक्चर - ८२०

Web Title: Increase in engineering, pharmacy registration; Churas for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.