वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा समावेश आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:38 AM2020-01-21T03:38:37+5:302020-01-21T03:39:18+5:30

सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्ट्स मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

The inclusion of 'sports medicine' in the medical education curriculum is essential | वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा समावेश आवश्यक

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा समावेश आवश्यक

Next

मुंबई : विविध प्रकारच्या मैदानी खेळांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्ट्स मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

वरळी येथील पोद्दार वैद्यकीय रुग्णालयाला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी भेट दिली. देशमुख यांनी पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय, पोद्दार रुग्णालय आणि पोद्दार वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. या वेळी पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र. अधिष्ठाता दीपनारायण शुक्ला उपस्थित होते.

या वेळी देशमुख म्हणाले, ‘स्पोर्ट्स मेडिसिन’ हे वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य असून असे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी वैद्यकीय संस्थांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मेडिकल स्पोर्ट तसेच शारीरिक शिक्षण यांसारख्या संकल्पनांना प्रोत्साहित करून अशा अभ्यासक्रमांचा समावेश येणाऱ्या काळात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात प्रामुख्याने होणे अपेक्षित आहे. योग, पंचकर्म असे संस्कार भारतीय संस्कृतीची अमूल्य संपदा आहे.

या संस्कारांचा दैनंदिन जीवनात समावेश होणे आवश्यक आहे. या संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत प्रोत्साहित करण्यात येईल. विद्यार्थ्यांशी संवाद, योगशास्त्र, औषधी वनस्पती, होमीओपॅथी, निसर्गोपचार, युनानी यांच्यामार्फत लोकांशी जवळीक साधली पाहिजे. 

पायाभूत सुविधांचा घेतला आढावा
या बैठकीदरम्यान देशमुख यांनी महाविद्यालयातील व वसतिगृहातील विविध पायाभूत सुविधांविषयी सविस्तर चर्चा केली. याअंतर्गत वैद्यकीय अभ्याक्रमात रुजू होण्याची प्रवेश प्रक्रिया, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना मिळणाºया रोजगार संधी, संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम, आयुर्वेदिक औषधांना दिलेले नियमन व किंमत, आयुर्वेदिक उत्पादने व उत्पादकांची माहिती घेतली.

Web Title: The inclusion of 'sports medicine' in the medical education curriculum is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.