राज्यातील १ हजार ९०० हून अधिक परवान्यांवर ‘संक्रांत’; २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 09:56 AM2024-01-13T09:56:07+5:302024-01-13T09:57:30+5:30

२.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची माहिती.

In maharashtra state more than 1 thousand 900 licenses in the state 2.85 crore drug stock seized | राज्यातील १ हजार ९०० हून अधिक परवान्यांवर ‘संक्रांत’; २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त

राज्यातील १ हजार ९०० हून अधिक परवान्यांवर ‘संक्रांत’; २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त

मुंबई : राज्यभरातील औषध उत्पादक आणि वितरकांवर सदोष औषधांविषयी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाने घाऊक, किरकोळ विक्रेते, वितरक अशा तब्बल १ हजार ९२५ परवान्यांचे निलंबन केले आहे. या कारवायांत २.८५ कोटींचा औषधांचा साठा जप्त केला आहे, तर ३० जणांना अटक करत एकूण २८ एफआयआर दाखल केले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

औषधे, सौंदर्यप्रसाधन विषयक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात ८९२ किरकोळ, तर १ हजार ३३ घाऊक विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात सर्वाधिक तपासण्या या कोकण विभागात करण्यात आल्या असून, सर्वांत कमी तपासण्यांचे प्रमाण अमरावती विभागात आहे. 

राज्यभरातील कारवाईमुळे काही औषध विक्रेत्यांवर राष्ट्रीय पातळीवरही कारवाई झाली, यातून काही औषधांवर बंदीही घालण्यात आली आहे. याखेरीज, या कालावधीत औषधांच्या नमुन्यांची केलेल्या तपासणीत एकूण ३२०० नमुन्यांपैकी १२० नमुने अप्रमाणित असल्याचेही समोर आले आहेत. त्यामुळे कोणत्याही औषधाची खरेदी करत असताना ग्राहकांनीही त्याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे - भूषण पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)

दोन जणांवर खटले, ३१ जणांना नोटीस :

 सेक्स समस्येवर औषध, शरीराची जाडी कमी करणे असे दावे करणाऱ्यांवर औषध उत्पादनांवर आणि अशा जाहिरातबाजीवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

 या कारवाईत गेल्या वर्षभरात एफडीएने ५ हजार २४६ रुपयांचा साठा जप्त केला आहे. 

 ३१ जणांना कारणे दाखवा नोटीसा :

त्यामुळे, अन्न आणि औषध प्रशासनाकडून अशा खोट्या जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, या मोहिमेअंतर्गत एकूण १ हजार १४२ जाहिरातींची तपासणी केली आहे. त्यात प्रशासनाला ३२ आक्षेपार्ह जाहिराती आढळून आल्या असून ३१ जणांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तर, दोन जणांवर खटलेही दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 

Web Title: In maharashtra state more than 1 thousand 900 licenses in the state 2.85 crore drug stock seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.