तोतया पोलिसांनी केली १३ लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:23 IST2026-01-19T12:23:18+5:302026-01-19T12:23:18+5:30

देवनार पोलिसांनी गोवंडी परिसरातून घेतले ताब्यात

Imposter police officers committed a theft of 13 lakhs Devnar police arrested them from the Govandi area | तोतया पोलिसांनी केली १३ लाखांची चोरी

तोतया पोलिसांनी केली १३ लाखांची चोरी

मुंबई: पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांकडून जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना देवनार पोलिसांनी गोवंडी परिसरातून तत्काळ ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आरोपींकडून १३ लाख रुपयांची रोख रक्कम, बनावट नंबरप्लेट असलेली कार व पोलिसी काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

गोवंडी येथील के. डी. जंक्शन, करबला मशीदजवळ येथे काही जण पोलिसांच्या काठ्यांसह एका वाहनचालकाशी वाद घालत असल्याचे देवनार पोलिसांच्या पथकाच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत कारची तपासणी केली. यावेळी प्रवीण पांडे, निसार अहमद ऊर्फ सलीम शेख व संजय दुबे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

मुद्देमाल हस्तगत तक्रारदार 

अनिता मिरांडा यांनी पोलिस असल्याची बतावणी करून आरोपींनी आपल्याकडून १३ लाख रुपये लुटल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींकडून संपूर्ण रक्कम व साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे
 

Web Title : फ़र्ज़ी पुलिसकर्मियों ने 13 लाख रुपये चुराए; मुंबई में तीन गिरफ़्तार

Web Summary : मुंबई के गोवंडी में पुलिस अधिकारी बनकर 13 लाख रुपये चुराने के आरोप में तीन लोगों को गिरफ्तार किया गया। देवनार पुलिस ने नकदी, एक नकली नंबर प्लेट वाली कार और पुलिस लाठियां जब्त कीं। पीड़िता, अनीता मिरांडा ने चोरी की सूचना दी। आगे की जांच जारी है।

Web Title : Fake Cops Steal ₹13 Lakh; Three Arrested in Mumbai

Web Summary : Three individuals impersonating police officers were arrested in Govandi, Mumbai, for stealing ₹13 lakh. Deonar police seized the cash, a fake-plated car, and police batons. The victim, Anita Miranda, reported the theft. Further investigation is underway.