मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील महत्वाच्या ट्रेन उद्यासाठी रद्द केल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:07 IST2019-06-28T21:05:58+5:302019-06-28T21:07:15+5:30
दोन दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील महत्वाच्या ट्रेन उद्यासाठी रद्द केल्या
मुंबई : मुसळधार पावसामुळे उद्या, शनिवारी मुंबई-पुणे मार्गावरील काही महत्वाच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते.
मुंबई पुण्याला वेगात जोडणारी प्रगती एक्स्प्रेस 12125/12126 अप आणि डाऊन बंद ठेवण्यात येणार आहे. तर 11009/11010 सिंहगड एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पनवेल कर्जत पुणे पॅसेंजर 51317/51318 ही देखील बंद ठेवण्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते. यामुळे काही तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने या मार्गावर दरड कोसळण्याची भीती आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्याचे समजते. तसेच भुसावळ- पुणे ट्रेनही कल्याण, पनवेलहून येणार नसून ती दौंडमार्गे वळविण्यात आली आहे.