Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी संध्याकाळी मेट्रो पावणेदोन तास राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 06:43 IST

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा १९ जानेवारीला ठराविक वेळेसाठी बंद असणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभाही होणार आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ यांना हिरवा कंदीलही पंतप्रधान दाखविणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा १९ जानेवारी रोजी सायं. ५.४५ ते रात्री ७.३० या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो वनने ही माहिती दिली असून या कालावधीत प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मेट्रो वनतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोनरेंद्र मोदी