Join us

मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारकरांसाठी महत्त्वाचे निर्णय; पाण्याचा प्रश्न मिटण्यास होणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:35 IST

कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

टॅग्स :मंत्रालयमहाराष्ट्र सरकार