तोतया पोलिसांचा डिलिव्हरी बॉयला साडेसहा लाखांचा गंडा, अमेरिकन डॉलर लुटले; पवई पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:32 IST2026-03-17T13:31:13+5:302026-03-17T13:32:17+5:30
सलमान शेख हे पवई येथील गॅलेरिया मॉलमधील ‘नवरंग फॉरेक्स’ या चलन विनिमय केंद्रात डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. १४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता दुकानाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संदेश आला.

तोतया पोलिसांचा डिलिव्हरी बॉयला साडेसहा लाखांचा गंडा, अमेरिकन डॉलर लुटले; पवई पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा
मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करत चार अनोळखी व्यक्तींनी एका डिलिव्हरी बॉयकडून साडेसहा लाखांचे अमेरिकन डॉलर लुटल्याची घटना घडली. विक्रोळी येथील सलमान शेख यांनी याप्रकरणी पवई पोलिसांत तक्रार दिली असून चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सलमान शेख हे पवई येथील गॅलेरिया मॉलमधील ‘नवरंग फॉरेक्स’ या चलन विनिमय केंद्रात डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत आहेत. १४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता दुकानाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संदेश आला. संबंधित व्यक्तीने ७ हजार ५९० अमेरिकन डॉलर बदलण्याची ऑर्डर दिली. भारतीय चलनात या रकमेची किंमत ६.५० लाख रुपये आहे. ही रक्कम हिरानंदानी गार्डन परिसरातील हॉटेल मेलवाजवळील समरसेट बिल्डिंगमध्ये आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सलमान व त्यांचे सहकारी अरमान शेख हे दोघे अमेरिकन डॉलर असलेली बॅग घेऊन सायंकाळी ५ वाजता समरसेट बिल्डिंग येथे पोहोचले. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकाने या इमारतीत रूम क्रमांक ३०३ नसल्याचे सांगितल्याने दोघांनाही संशय आला.
रम्यान, बाहेर गेलेल्या अरमान यांना दोन व्यक्तींनी अडवत पोलिस असल्याची बतावणी केली. त्याचवेळी आणखी दोघांनी इमारतीत येऊन सलमान यांनाही चौकशीसाठी सोबत घेतले. त्यानंतर त्यांनी रिक्षा बोलावून सलमान यांना त्यात बसवले. त्यानंतर अंधेरी एमआयडीसी मार्गे पुढे जोगेश्वरी पुलाखाली रिक्षा थांबवून सलमान यांच्याकडे अमेरिकन डॉलर असलेली बॅग जप्त केल्याचे सांगत त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.