उत्तर पूर्वमध्ये महिला मतदारांवर लोकप्रियतेचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:52 AM2019-04-22T02:52:34+5:302019-04-22T02:53:23+5:30

संमिश्र लोकवस्ती असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत २०१४ मध्ये महिला मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव झाल्याचे चित्र दिसून आले.

Impact of popularity among women voters in the North East | उत्तर पूर्वमध्ये महिला मतदारांवर लोकप्रियतेचा प्रभाव

उत्तर पूर्वमध्ये महिला मतदारांवर लोकप्रियतेचा प्रभाव

Next

मुंबई : संमिश्र लोकवस्ती असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत २०१४ मध्ये महिला मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव झाल्याचे चित्र दिसून आले. महिलाच्या मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १० टक्क्यांनी वाढ़ झाली. यंदाही महिला मतदारांची मते आघाड़ी आणि भाजप उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. मात्र यंदा महिला मतदारांवर कोणाचा प्रभाव पडतो हे निवडणुकीच्या निकालातूनचं समजेल.
उत्तर पूर्व मुंबईत एकुण १५ लाख ८८ हजार ३३१ मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख २३ हजार ५६६ महिलाँचा समावेश आहे. २०१४ च्या तुलनेत २१ हजार ६८८ महिला मतदाराँची संख्या कमी आहे. गेल्या ४ निवडणुकाँमध्ये महिला मतदार पुरुषांच्या बरोबरीने मतदानासाठी घराबाहेर पड़त आहेत. महिला मतदाराना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि आघाड़ीच्या महिला कार्यकर्त्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

5०% महिलांनी २०१४ मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७ लाख ४५ हजार २५४ महिला मतदार होत्या. हा आकडा १० टक्क्यांनी वाढ़ला. तर ५२ टक्के पुरुषांनी मतदान केले. या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला.

4० % महिलांनी २००९ मध्ये मतदान केले. आधीच्या दोन निवडणुकीच्या तुलनेत हा आकड़ा ४ टक्क्यांनी घसरला. 44 % पुरुषांचे प्रमाण होते.

Web Title: Impact of popularity among women voters in the North East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.