Join us

व्हेज-नॉनव्हेज टेबलवरुन IIT Mumbai मध्ये गोंधळ; विद्यार्थ्यांवर 10000 रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:55 IST

आयआयटी मुंबईमध्ये व्हेज-नॉनव्हेज टेबलवरुन सुरू झालेला वाद वाढत आहे.

IIT Mumbai: भारतातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेले IIT Mumbai आजकाल आपल्या खाद्य धोरणामुळे चर्चेत आले आहे. मेसमध्ये शाकाहारी टेबलवर बसून मांसाहार खाणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांवर फुड पॉलिसीचे पालन न केल्याचा आरोप केला आहे.

आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमध्ये शाकाहारी जेवणासाठी स्वतंत्र टेबल आहे. या टेबलावर बसून नॉनव्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही आयआयटी मुंबईच्या या अजब धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय प्रकरण आहे?IIT मुंबईमधील 12, 13 आणि 14 नंबरच्या हॉस्टेलसाठी एकच मेस आहे. या मेसमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी व्हेज फूडचे 6 टेबल ठेवण्यात आले आहेत. हे टेबल जैन मेनूच्या आधारावर तयार केले गेले आहे. 28 सप्टेंबर रोजी आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी या टेबलावर कब्जा केला आणि वेगळा टेबल ठेवण्यास विरोध केला.

वेगळे टेबल ठेवून मुस्लिम, दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळे केले जात असल्याचा आरोप इतर विद्यार्थ्यांनी केला. याबाबत मेस कमिटीला कळताच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.

मेस कौन्सिलने नोटीस बजावलीआयआयटी मुंबईच्या मेस कौन्सिलने विद्यार्थ्यांच्या नावाने एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने कॉलेजच्या फूड पॉलिसीचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे कौन्सिलचे म्हणणे आहे. जे विद्यार्थी मेसमध्ये वातावरण बिघडवतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मेस कौन्सिलने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. 

टॅग्स :आयआयटी मुंबईमुंबईमहाविद्यालयविद्यार्थी