राष्ट्रविरोधी घोषणांपासून दूर राहा; IIT बॉम्बेकडून हॉस्टेलचे नवे नियम जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:09 PM2020-01-29T17:09:18+5:302020-01-29T17:09:40+5:30

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी(AMU)मध्ये झालेल्या वादग्रस्त विधानांवरील वादानंतर आयआयटी बॉम्बेनं बुधवारी हॉस्टेलचे नवे नियम जारी केले आहेत.

iit bombay issues new circular warns to stay away from anti national slogans | राष्ट्रविरोधी घोषणांपासून दूर राहा; IIT बॉम्बेकडून हॉस्टेलचे नवे नियम जारी

राष्ट्रविरोधी घोषणांपासून दूर राहा; IIT बॉम्बेकडून हॉस्टेलचे नवे नियम जारी

Next

मुंबई- जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी(AMU)मध्ये झालेल्या वादग्रस्त विधानांवरील वादानंतर आयआयटी बॉम्बेनं बुधवारी हॉस्टेलचे नवे नियम जारी केले आहेत. या नव्या नियमांतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानांपासून दूर राहिलं पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे. तसेच कॅम्पसमध्ये परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर अथवा पॅम्प्लेट वाटले जाऊ नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आयआयटी बॉम्बेनं नव्या नियमांतर्गत कॅम्पसमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना समाजकंटकांवर कारवाई करण्याची पूर्णतः सूट दिलेली आहे. 15 नियमांची नियमावली जारी करण्यात आली असून, कॅम्पसमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रविरोधी, समाजविघातक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही नियमावली स्टुडंट्स अफेअर्स असोसिएटचे डीन प्रोफ्रेसर जॉर्ज मॅथ्यू यांनी जारी केली आहे.  

अँटी नॅशनल शब्दाबाबत नाराजी
गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या एका गटानं संस्थेच्या संचालकांना एक पत्र लिहिलं होतं. ज्यात त्यांनी परिसरात राजकीय विधान करणाऱ्यांवर टीका केली होती. हॉस्टेलच्या नव्या नियमावलीत अँटी नॅशनल शब्दाबाबत नाराजी व्यक्त केली. 

शरजीलच्या समर्थनार्थ दिलं विधान
IIT बॉम्बेचे संचालक सुभाशीष चौधरी यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांनी आपले राजकीय विचार कॅम्पसच्या बाहेर जाऊन व्यक्त करावेत, त्यावर विद्यार्थ्यांच्या एका गटानं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. तसेच JNU विद्यार्थी शरजील इमामला समर्थन देत एक विधान जारी केलं आहे. शरजीलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केलेली आहे. 
 

Web Title: iit bombay issues new circular warns to stay away from anti national slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.