अश्लील टीका-टिप्पणी कराल अन् फुगे फेकल्यास थेट कोठडी, जाणून घ्या नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:28 IST2026-03-02T16:27:21+5:302026-03-02T16:28:26+5:30

होळी, धूलिवंदनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

If you make obscene comments and throw balloons you will be immediately detained know the rules | अश्लील टीका-टिप्पणी कराल अन् फुगे फेकल्यास थेट कोठडी, जाणून घ्या नियम...

अश्लील टीका-टिप्पणी कराल अन् फुगे फेकल्यास थेट कोठडी, जाणून घ्या नियम...

मुंबई :

होळी, धूलिवंदनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. समाजकंटकांविरुद्ध तसेच सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांवर रंगीत पाणी उडविण्यासह अश्लील टीका-टिप्पणी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी काही कृत्यांना प्रतिबंधित करत आदेश पारित केले आहेत. १ ते ७ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत हे आदेश लागू राहणार असून, त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. साध्या गणवेषातील पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणार आहे.

वाहतूक विभागासह एसआरपीएफ प्लॅटून, आरसीपी प्लॅटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम, होमगार्डस महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी, गर्दीच्या ठिकाणी गस्त व फिक्स पॉईंट बंदोबस्त केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन व ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्या आस्थापना व अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे.

फुगे फेकल्यास कारवाई
अश्लील शब्द, घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी म्हटल्यास बडगा उगारला जाणार आहे.

हावभाव किंवा नकलेचा वापर, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते.

त्याचबरोबर पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे. पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title : अश्लील टिप्पणी, गुब्बारे फेंकना जेल की ओर: नए नियम

Web Summary : होली के लिए मुंबई पुलिस ने सुरक्षा बढ़ाई, अभद्रता और सार्वजनिक गड़बड़ी के खिलाफ चेतावनी दी। अश्लील भाषा का प्रयोग करने या पैदल चलने वालों पर पानी के गुब्बारे फेंकने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई, गिरफ्तारी सहित, की जाएगी। आदेश 7 मार्च तक प्रभावी हैं।

Web Title : Obscene Remarks, Throwing Balloons Lead to Jail: New Rules

Web Summary : Mumbai police tighten security for Holi, warning against indecency and public disturbances. Strict action, including arrest, will be taken against those using obscene language or throwing water balloons at pedestrians. Orders are effective until March 7th.