हिंमत असेल तर ‘वर्षा’वर मोर्चा काढा - विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 07:23 IST2019-07-18T04:47:04+5:302019-07-18T07:23:30+5:30
एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे.

हिंमत असेल तर ‘वर्षा’वर मोर्चा काढा - विजय वडेट्टीवार
मुंबईः एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर मतांसाठी हा मोर्चा आहे. हिंम्मत असेल तर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढून दाखवावा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.
>ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल- पाटील
पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवरील शिवसेनेचा मोर्चा म्हणजे शेतकºयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. राज्यातील शेतकºयांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे, त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जावू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाही, असेही ते म्हणाले.