Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास आघाडीकडून सकारात्मक विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 05:44 IST

भुजबळ म्हणाले, सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची

छगन भुजबळ

नाशिक : जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला असल्याचे शरद पवार यांनी अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री पद पाहिजे, हे त्यांनी ठरवले पाहिजे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हिंमत धरत दावा कायम ठेवावा. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा सकारात्मक विचार करेल, असे सूचक वक्तव्य केले.

भुजबळ म्हणाले, सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना किमान दिलासा देण्यासाठी २५ हजार कोटींची आवश्यकता आहे.

टॅग्स :शिवसेनाछगन भुजबळभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस