Join us

कर नाही त्याला डर कशाला! वकील जयश्री पाटील यांनी दिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:09 IST

Advocate Jayashree Patil reaction : गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ''कर नाही त्याला डर कशाला!''. 

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनतर आता मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून त्यांना त्यांच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ''कर नाही त्याला डर कशाला!''. 

पोलिसांचा मोठा फौजफाटा घरात घुसल्याचा आरोप वकील जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या, अनिल देशमुखांना जेलमध्ये पाठवलं, त्याचा बदला शरद पवार घेत आहेत. पोलीस घरी चौकशी आले. चौकशीला आम्ही तयार होतो. कर नाही त्याला डर कशाला!. मी कपडे बदलत असताना महिला पोलीस माझ्या बेडरूममध्ये घुसल्या. माझ्या कुटुंबाला धोका आहे.

मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

 

सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील आपल्या तान्ह्या बाळासह आणि १० वर्षीय मुलगी झेन गावदेवी पोलीस ठाण्यात हजर आहेत. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस दादागिरी करत असून शरद पवारांचा दबाव आहे. मुंबई पोलिसांकडून देखील आमच्या कुटुंबाला धोका आहे. तर १० वर्षीय झेन सदावर्ते यांनी देखील वडील नात्याने मुलीला भेटू देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

 

टॅग्स :पोलिसवकिलशरद पवारमुंबई