Join us  

'मी पुन्हा येईन' काहीतरी नवीन घेऊन, अमृता फडणवीसांनी मानले नेटीझन्सचे आभार

By महेश गलांडे | Published: November 18, 2020 2:10 PM

तिला जगू द्या... या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी भाऊबीज दिवशी त्यांच्या मधूर आवाजातील गाणं इंटरनेटवरुन रिलीज केलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणं त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केलं.

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्ताला रिलीज झाले आणि काही तासांतच ते व्हायरलही झाले. अमृतांनी हे गाणे नारी शक्तीला समर्पित केले आहे. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे. अमृतांच्या या गाण्याला दोनच दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्यूव्हज मिळाले आहेत. त्यामुळे, अमृता यांनी ट्विट करुन चाहत्यांचे आणि टीकाकारांचेही आभार मानले. 

अमृता फडणवीस यांनी भाऊबीज दिवशी त्यांच्या मधूर आवाजातील गाणं इंटरनेटवरुन रिलीज केलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणं त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केलं. नारीशक्तीच्या सन्मानार्थ या गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे, इंटरनेटवर हे गाणं चागलंच व्हायरल झाला. तर, काहींनी टीकाही केली, त्याबद्दल अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. ''तिला जगू द्या... या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल,'' असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. 

 

अमृता फडणवीस यांच्या गाण्याला 1 मिलियन्स पेक्षा अधिक व्यूव्हज मिळाले आहेत. तसेच, सोशल मीडियावरही हे गाणे चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी या गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले. तसेच, भाजपाविरोधी पक्षातील समर्थकांनीही या गाण्यावरुन टीका केली. मात्र, अमृता यांनी टीकाकारांचे आणि कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.  चाहत्यांना हे गाणे आवडले असेलही पण मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश टिळेकर यांनी मात्र अमृतांच्या या गाण्यावर सडकून टीका केली आहे. ‘हिला नको गाऊ द्या,’ असे लिहित त्यांनी अमृतांच्या या गाण्यावर भलीमोठी पोस्ट शेअर केली.

महेश टिळेकर म्हणतात 

चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर  पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही.  सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुस-याला आनंद देण्याऐवजी दु:ख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?  

टॅग्स :अमृता फडणवीससोशल मीडियाव्हायरल फोटोज्इंटरनेटऑनलाइन