Join us  

'महाराष्ट्र सांभाळता येईना अन् चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 3:05 PM

बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा तिरकस निशाणाही राऊत यांनी साधला.

ठळक मुद्देबिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा तिरकस निशाणाही राऊत यांन

मुंबई - खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. त्यावर, नारायण राणेंनी राऊत यांना टार्गेट केलं आहे. महाराष्ट्र, सांभाळता येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!, असे ट्विट करुन राणेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 

बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा तिरकस निशाणाही राऊत यांनी साधला. 'उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल' असे राऊत म्हणाले. 

खासदार राऊत यांच्या स्टेटमेंटवरुन नारायण राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 'महाराष्ट्र, सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला!', असे ट्विट नारायण राणेंनी केली आहे.  

निलेश राणेंनीही साधला होता निशाणा

दिल्लीतील उन्हाळा कडक आहे, पण दिल्लीचे सुस्तावलेपण त्यापेक्षा गंभीर आहे. एक प्रकारचा आळस दिल्लीच्या नसानसांत भरलेला दिसत आहे. आज देशात 14 कोटी लोक बेरोजगार झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले, पण देश चालवणाऱ्या दिल्लीलाही काम नाही असे चित्र आहे. राजकीय आंदोलने नाहीत म्हणून कार्यकर्ते आळशी झाले. विरोधक थंड पडले म्हणून राज्यकर्ते लोळागोळा झाले. दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती, असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. मात्र संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत एक आव्हान दिले होते.

संजय राऊत यांच्या विधानावर निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, तुम्ही एक तरी निवडणूक लढवून दाखवा. एक मुंबई शगर सांभाळता येत नाही आणि देशाच्या वार्ता करतायं, असं निलेश राणे यांनी सांगितले.

सुशांतप्रकरणी राणेंची भूमिका 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाचा निकाल राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे. यावरून भाजपाचे खासदार नारायण राणेंनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारनं आत्मपरिक्षण करावं आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता तरी त्यांचं तोंड बंद ठेवावं, अशी जोरदार टीका राणेंनी केली.

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या इच्छेचा आदरच केला आहे, असं मत राणेंनी व्यक्त केलं आहे. न्यायालय राज्यातील प्रकरणं सीबीआयकडेच का देतात? सरकारवर ही वेळ का आली? याचं आत्मपरिक्षण राज्य सरकारनं करावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला. राज्यातील सरकार हे जनतेसाठी नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचं न्यायालयानं दिलेल्या निकालातून सिद्ध झालं आहे, अशा शब्दांत ते सरकारवर बरसले.

टॅग्स :नारायण राणे संजय राऊतमुंबईभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरे