लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्या पक्षाचे खासदार फुटणार असल्याची माहिती देत सुटले आहेत. परंतु, जे माझ्यासोबत राहिले, खासदार म्हणून निवडून आले ते इकडे तिकडे जाणार नाहीत. तुमचावर माझा विश्वास असून, त्या भरवशावरच मी ही लढाई लढत आहे. पण, तुम्हालाच लढायचे नसेल तर तसे सांगा, मी थांबतो, असा इशारा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीत दिला. तर, राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव पुढे आल्याने खा. प्रियंका चतुर्वेदी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) चे शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर उद्धवसेनेचे खासदार फोडण्याची तयारी शिंदेसेनेकडून सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती.
पवार यांना पाठिंबा का ?
ठाकरे यांनी शरद पवार यांना पाठिंबा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली. खा. चतुर्वेदी यांनी बैठकीत संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव का घेतले असा सवाल केला. त्यावर, ते बोलले तरी मी पक्षप्रमुख असून, निर्णय मीच घेणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
आदित्य यांनी महाराष्ट्रात फिरावे
महापालिका, नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला अपयश आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ पसरली आहे. ती दूर करण्यासाठी नेत्यांचे राज्यात दौरे करण्याची आवश्यकता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा असल्या तरी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात फिरले पाहिजे, अशी भावना खासदारांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्व संमतीनंतर निर्णय : राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला हवी होती. काँग्रेस नेत्यांनी फोन करून ही जागा त्यांना सोडण्याची विनंती केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोला असे सांगून हा वाद टाळला. त्यानंतर सर्व संमतीने शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती ठाकरेंनी दिली. मात्र, या बैठकीला खा. राऊत उपस्थित नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.
Web Summary : Uddhav Thackeray warned MPs, citing potential defections to BJP/NCP. He expressed confidence but offered to halt if they lacked resolve. Sharad Pawar's Rajya Sabha nomination reportedly upset Priyanka Chaturvedi. Thackeray defended supporting Pawar, amidst discussions on party strategy and leadership roles.
Web Summary : उद्धव ठाकरे ने सांसदों को भाजपा/राकांपा में संभावित दलबदल का हवाला देते हुए चेतावनी दी। उन्होंने विश्वास जताया पर लड़ने की इच्छाशक्ति न होने पर रुकने की पेशकश की। शरद पवार के राज्यसभा नामांकन से प्रियंका चतुर्वेदी कथित तौर पर नाराज। ठाकरे ने पार्टी रणनीति और नेतृत्व भूमिकाओं पर चर्चा के बीच पवार का समर्थन किया।