Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:44 IST

राऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलंय. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देराऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलंय. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर पलटवार करताना म्हटले

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला होता. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यावर संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच केलंय. त्यामुळे, दोन दिग्गज राजकीय नेत्यांमधील टीका विनोदाचा मुद्दा बनलीय.   

राऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलंय. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर पलटवार करताना म्हटले. तसेच, संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक वाद चर्चेचा विषय बनला आहे.  

काय म्हणाले होते संजय राऊत

"चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरूष आहेत. चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो. मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावं लागणार आहे. कारण, उद्धवजींच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा