Join us  

छत्रपतींच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट सरकार कधीही बघितलं नाही : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 5:09 PM

Kangana Ranaut : मुंबई महानगर पालिकेच्या या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे.

शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महानगर पालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर (  Kangana Ranaut's office) कारवाई केली. पण, मुंबई उच्च न्यायलयानं या कारवाईला स्थगिती देण्यात आली. मुंबई महानगर पालिकेच्या या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी, ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली, अशी प्रतिक्रिया दिली.

Kangana Ranaut : ...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की,''छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. आपल्या विचारांचा विरोध करणारे, व्यक्ती असतील, पत्रकार असतील या सर्वांना दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अवैधपणे होत आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याचा महाराष्ट्राचा किंवा मुंबई पेलिसांचा अवमान होतो, त्याचं समर्थन करता येत नाही. पण, सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही. या कृतीमुळे उभ्या देशात महाराष्ट्राची बदनामी होतेय.''

''काल-परवापर्यंत ते बांधकाम तिथे होतं, तेव्हा कारवाई केली जात नाही. पण, अचानक कुणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते. मग अन्य अवैध बांधकामावर सरकार का कारवाई करत नाही? केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. राज्य सरकारला शोभणारी नाही. महाराष्ट्रात एकप्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे,''असेही ते म्हणाले. 

कंगनाला मोठा दिलासा; कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय - कंगनाकंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

कंगनानं १२ सेकंदांचं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेकंगना राणौतबॉलिवूड