आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:42 IST2025-10-31T06:41:58+5:302025-10-31T06:42:21+5:30
मुलांकडून थेट फी वसूल करण्यावरुन होता वाद

आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर
मुंबई : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या अपहरणकर्त्याने केलेला दावा माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खोडून काढला असून त्याने शासनाच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. पण त्याला आपण स्वतः चेकने पैसे दिल्याचा खुलासा केसरकर यांनी केला आहे.
पवई येथे १७ मुलांना एका स्टुडिओत ओलिस ठेवणारा रोहित आर्या याने शासनाकडून २ कोटी रुपये मिळाले नसल्याचा दावा केला होता. यासाठी त्याने दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना उपोषणही केले होते. आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून आपण मुलांना ओलिस ठेवल्याचे आर्या याने म्हटले होते. आर्याच्या या दाव्यानंतर केसरकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा वैयक्तिक त्यास मदत केली होती. मी चेकने त्याला स्वतः
रोहित आर्या हा स्वच्छ मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होता. तो शासनाच्या मोहिमेत सहभागी झाला होता. त्या संदर्भात त्याने काही मुलांकडून थेट फी वसूल केली, असे विभागाचे म्हणणे होते. पण आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही, असे आर्याचे म्हणणे होते. त्याने विभागासोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. पण मुलांना ओलिस ठेवणे चुकीचे होते असे केसरकर म्हणाले.
मनोरुग्णाला काम कसे दिले? विरोधकांचा सवाल
केसरकर यांनी म्हटले आहे की, निरागस मुलांना डांबून ठेवणारा रोहित आर्या मनोरुग्ण होता, असे मुंबई पोलिस सांगत आहेत. तो मनोरुग्ण होता तर त्याला 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर' आणि 'माझी शाळा' अशा मुलांचा थेट सहभाग असलेल्या योजना राबविण्यास का दिल्या? अशा संवेदनशील योजनांमध्ये मनोरुग्ण व्यक्तीला काम देणे म्हणजे शासनाच्या निष्काळजीपणाची पराकाष्ठा नाही का? मनोरुग्णाला काम दिले, त्याचे बिल थकवले आणि त्याने प्रश्न विचारल्यावर त्याचा एन्काऊंटर केला हा कोणता न्याय आहे? ही प्रशासनाची जबाबदारी की दडपशाही ? सरकार सत्य दडपते आहे का?, अशा शब्दात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी टीका केली आहे.
२००३ च्या 'त्या' ओलिस नाट्याची झाली आठवण
२५ मे २००३ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका हवालदाराने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिपार्चर टर्मिनल २सी वर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर त्यांच्या सहा सहकाऱ्यांना ओलिस ठेवले होते. सात तासांच्या अपहरण नाट्यानंतर सहा जणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर गुन्हेगाराने आत्मसमर्पण केले होते.
खिडक्यांना बसवले सेन्सर
रोहित आर्याने खिडक्यांना आणि दरवाज्यांना सेन्सर बसवले होते. त्यामुळे दाराजवळ किंवा खिडकीजवळ कोणीही आले, हालचाल केली तर बीप असा आवाज यायचा. त्यामुळे बाहेर कोणीतरी आहे हे कळायचे. रोहित ने त्या जागेला मिनी कमांड सेंटर बनवले होते असेही एक अधिकारी म्हणाला. पुढे पाऊल टाकताच सेंसर अॅक्टिव्हेट व्हायचे. पोलिसांनी या सिस्टीमचा वापर करत आर्याला चकमा दिला.
ओलिस ठेवलेल्यांची वैद्यकीय तपासणी
ओलिस ठेवलेले सर्वजण अचानक घडलेल्या या घटनेमुळे मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना काही वेळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र, सर्वांची प्रकृती सुखरुप असल्याने त्यांना रात्री सुमारे ८:३० वाजता सोडण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.