Rajan Salvi: मला निष्ठेचे प्रमाणपत्र तेव्हाच मिळाले, बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत राजन साळवींचं शंकासूरांना खणखणीत प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 20:14 IST2022-08-19T20:08:11+5:302022-08-19T20:14:19+5:30
Rajan Salvi: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर उद्धव ठाकरेंसोबतचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच ते आमदार राजन साळवी असल्याचा दावा केला जात होता.

Rajan Salvi: मला निष्ठेचे प्रमाणपत्र तेव्हाच मिळाले, बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत राजन साळवींचं शंकासूरांना खणखणीत प्रत्युत्तर
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर शिवसेनेच्या ४० च्या आसपास आमदारांनी त्यांना साथ दिली होती. हे सर्व आमदार महाविकास आघाडीविरोधात गेल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हे सर्व घडत असताना अनेक खासदार आणि नेतेही एकनाथ शिंदेंसोबत आले होते. दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर उद्धव ठाकरेंसोबतचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच ते आमदार राजन साळवी असल्याचा दावा केला जात होता. दरम्यान, राजन साळवी यांनी संभ्रम निर्माण करून त्यांच्या निष्ठेबाबत शंका निर्माण करणाऱ्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.
या संदर्भात राजन साळवी यांनी एक ट्विटमधून या शंकासुरांचा समाचार घेतला आहे. त्यात ते म्हणाले की, मला निष्ठेचं प्रमाणपत्र १५ ऑक्टोबर २००२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिहे होते. मला खोक्यांची गरज नाही, असं रोखठोक मत राजन साळवी यांनी मांडलं आहे.
निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही....@AUThackeray@OfficeofUT@ShivSenapic.twitter.com/QOcXYogc3Q
— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) August 19, 2022
दरम्यान, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढून ४१ होणार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. त्यानंतर तो आमदार कोण याबातत तर्कवितर्क लढवले जात होते.