Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्रा चाळ कुठेय माहिती नाही, संजय राऊत यांची ईडीला नकारात्मक उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:12 IST

sanjay Raut : ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला. जवळपास ४ तास झाले संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे.  

मुंबईसंजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं होतं. त्यानुसार त्यांना 28 जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. प्रवीण राऊत आणि पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत मागील चौकशीला हजर राहू शकले नव्हते. त्यानंतर त्यांना ईडीने दुसरं समन्स बजावत १ जुलैला चौकशीसाठी बोलावलं. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, १० वर्षांनंतर पत्रा चाळ प्रकल्प रखडल्यानंतर आता सुरु असलेल्या चौकशीत संजय राऊत नकारात्मक उत्तरं देत आहेत. संजय राऊत यांनी मला पत्रा चाळ कुठे आहे नाही असं उत्तर ईडीला दिलं. त्यावर ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला. जवळपास ४ तास झाले संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे.  

मी पळपुटा नाही. माझा देशातील केंद्रीय संस्था आणि ईडीवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोर जाण्याची हिम्मत आहे. राज्याचा खासदार, नागरिक म्हणून या संस्थाना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान, चौकशीला जाण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार राऊत म्हणाले की, मी निर्भय आणि निडर असल्यानं बेधडकपणे ईडीच्या कारवाईला समोर जाणार आहे. मी कधीच चुकीचं काम केलेलं नाही त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. मी बेडरपणे चौकशीला सामोरा जातोय, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयमुंबई