Shiv Sena News: राज्यात पुन्हा एकदा निवडणूक लागली आहे. या निवडणुकीमुळे अनेक इच्छुक आशेला होते, पण मोजक्याच पदरात आमदारकी पडली आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पाच उमदेवार जाहीर केले आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आलेली असून, चंद्रकांत रघुवंशी यांची आमदारकी निश्चित झाली आहे. पण, पक्षाकडून डावलण्यात आल्याने शीतल म्हात्रे यांना आपली नाराजी लपवता आली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवसेनेचे आमश्या पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या जागेवर शिंदेंनी त्याच भागातील व्यक्तीला संधी दिली आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शीतल म्हात्रेंनी एक पोस्ट केली आहे.
मला जे हवं होतं, ते मिळालं नाही
शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या शीतल म्हात्रेंनी आपली नाराजी हिंदी कवितेतून व्यक्त केली आहे. मला जे अपेक्षित होतं, ते काही मिळालं नाही. ध्येय अजून दूर आहे आणि त्यासाठी चालावं लागणार आहे, असेही त्यानी म्हटले आहे.
मंज़िलें अभी और भी हैंचलना अभी दूर तक और भी है।
जो चाह थी मेरीवो मुझे नहीं मिली,पर जो कुछ भी मिलावो किसी स्वप्न देखी चाहसे कम भी नहीं…
शीतल म्हात्रे या माजी नगरसेविका आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी आधी ठाकरेंना साथ दिली. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्या सध्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधान परिषदेवर पाठवले आहे.
भाजपने तीन जागांवर दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधूनही अनेकजण इच्छुक होते, पण ज्या नावांची चर्चा होती, त्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली गेली नाही.