Join us  

"राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री; भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती" 

By मुकेश चव्हाण | Published: October 24, 2020 3:45 PM

मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता.

मुंबई/ नाशिक: भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी टेन्शन फ्री झालो आहे, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधता एकनाथ खडसे यांनी हे विधान केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी आल्याने मी टेन्शन फ्री झालो आहे, भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा असल्याचं एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितले.

अजित पवार अन् जितेंद्र आव्हाडांच्या नाराजीच्या वृत्तावर खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान भाजपा सोडण्याचा फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी भाजपावर केली आहे.

 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण- 

 राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी क्वारंटाईन व्हावे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

टॅग्स :एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकार