Join us

"मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही, मी बोलणं योग्य नाही", कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 14:26 IST

Sanjay Raut: परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालावर काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या निकालानं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या याच निकालावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हायकोर्टानं सरकारला चपराक लगावलीय; हफ्तेखोरीचं सत्य आता बाहेर येईल; फडणवीसांची जोरदार टीका

"मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. कोर्टाचा निर्णय अद्याप माझ्या हातात आलेला नाही. त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. फक्त हायकोर्टाच्या निर्णयाचा सरकार अभ्यास करेल इतकंच मी सांगू शकतो", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

"इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तोही सांगेल की...", चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

तपास यंत्रणा परमेश्वराचा अवतार नाहीकोर्टाच्या निर्णयाचा मान आपण आदर राखत आलो आहोत, असं सांगतानाच संजय राऊत यांनी देशातील कोणतीही तपास यंत्रणा ही काही परमेश्वराचा अवतार नाही. काल ममता बॅनर्जी यांनीही केंद्रीय तपास यंत्रणेवर काही आरोप केले आहेत. त्यामुळे कोर्टानं नेमका काय निर्णय दिलाय ते आधी कळूदेत. त्यावर सरकारकडून भूमिका मांडली जाईल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतअनिल देशमुखपरम बीर सिंगशिवसेना