Join us  

मी पळून गेलो नव्हतो, सोशल मीडियात खळबळ माजवणाऱ्या महाराजांचं 'सत्यवचन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:29 PM

गावात आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क

मुंबई - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका महाजांनी बातमी व्हायरल झाली होती. भागवत किर्तनाला महाराज आले अन् बाईला घेऊन पळाले, अशी बातमी माध्यमांत होती. मात्र, संबंधित महाराजांनी हे वृत्त फेटाळलं असून मी माझ्या घरी सुखरुप असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी वारकरी संप्रदायातील व्यक्ती असून माझे गुरूवर्य आज माझ्यासोबत आहेत. माझी पत्नी आणि मुलांसोबत मी घरीच असून पळाल्याचे वृत्त हे बदनामीकारक असल्याचं भंडाऱ्यातील या महाराजांनी सांगितलं.  

गावात आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क गावातील एका विवाहितेला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. भंडारानजीकच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने सोशल मीडियात खळबळ उडाली होती. मात्र, महाराज दिनेश मोहतुरे यांनी हे वृत्त फेटाळले आहे. महाराज सदर महिलेला घेऊन पळाले ही घटना, व बातम्या सोशल मीडियावरुन पसरविण्यात आल्या आहेत. मी माझ्या कामासाठी वृंदावनला गेलो होतो. त्यावेळी, विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी मला ताब्यात घेतलं होतं. सध्या, मी माझ्या कुटुंबीयांसमवेत घरी सुखरुप आहे. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियात आलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत. बिनबुडाचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत, असे मोहतुरे महाराजांनी स्पष्टीकरण दिलंय.

भागवत कथा सांगायला महाराज गावात आले अन् विवाहितेला घेऊन धूम पळाले

मी हिंदुत्ववादासाठी किती झटलो, गोमातेसाठी किती झटलो हे सर्वांना माहित आहे. मात्र, माझ्या कार्याची महती पाहवत नसल्यानेच माझ्या निंदकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या स्त्रीसोबत माझे संबंध जोडण्यात आले, त्यांचाही कुठला दोष नाही व माझाही कुठला दोष नाही. त्या त्यांच्या घरी सुखरुप आहेत आणि मी माझ्या घरी सुखरुप आहे. मात्र, आम्हा दोन्ही कुटुंबीयांवर जे आघात झाले, ते भरून येणारे नाहीत. मीडियावाल्यांनी चुकीचं पसवरलं, आता सत्य पसरवावं असंही या महाराजांनी म्हटलंय.  

दरम्यान, भंडारा लगतच्या मोहदूरा येथे कथा सप्ताह कथाचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचनासाठी सावनेर तालुक्यातील कुबडा येथील एका महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच त्यांची नजर भागवतातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. महाराजांचे या काळात घरी येणे-जाणे सुरू झाले. एकदाचा कथा सप्ताहाचा समारोप झाला आणि बुधवारी सायंकाळी गावातील एक विवाहिता बेपत्ता झाली. त्यानंतर, स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. 

टॅग्स :सोशल मीडियाभंडारापोलिसवारकरी