Join us  

हुश्श ! थांबला एकदाचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 6:29 PM

धो धो कोसळणारा पाऊस आता ब-यापैकी विश्रांतीवर गेला.

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात धो धो कोसळणारा पाऊस आता ब-यापैकी विश्रांतीवर गेला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईत ११.६ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली असून, बुधवारी संपुर्ण दिवस पावसाने मुंबईत मोकळीक घेतली होती.पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पडझडीच्या घटना घडतच आहेत. पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. मुंबई शहरात २ ठिकाणी झाडे कोसळली. मुंबईत एकूण ४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दरम्यान, बुधवारी पावसाने मुंबईत विश्रांती घेतली असली तरी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.२७  ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. २८ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २९ ऑगस्ट कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारसह शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या एक, दोन सरी पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशलहवामान