सोशल मीडियावर विनोदाचा पूल अन् प्रतिभेचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:20 AM2018-07-04T00:20:51+5:302018-07-04T00:21:02+5:30

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ अडचणींचा डोंगर घेऊन आली. सकाळी अंधेरी येथील पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली.

 A humorous stream of social media and a rain of talent | सोशल मीडियावर विनोदाचा पूल अन् प्रतिभेचा पाऊस

सोशल मीडियावर विनोदाचा पूल अन् प्रतिभेचा पाऊस

Next

मुंबई : मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ अडचणींचा डोंगर घेऊन आली. सकाळी अंधेरी येथील पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात झाला. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईचे तळे होण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण झाली. त्यामुळे लोकलमध्ये, रस्त्यावर, घरामध्ये अडकलेल्या मुंबईकरांच्या प्रतिभेला जणू धुमारे फुलले व बाहेर मुसळधार पाऊस सुरू असताना सोशल मीडियावर विनोदाचा पूल अन् प्रतिभेचा पाऊस बरसू लागला.
कोणी वांद्रे परिसरातून जात असेल तर कृपया मलाही बोटीत सोबत घ्यावे अशी विनंती नेटकऱ्याने केली. तर, गुगल मॅपवर ज्याप्रमाणे वाहतुकीचे अपडेट मिळतात त्याप्रमाणे पाणी साचलेली जागा दाखवण्याची सुविधा सुरू करण्याची मागणी एकाने केली. टिष्ट्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक आपली प्रतिभा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. रेल्वे, महापालिका आदींसह सरकारी यंत्रणांना चिमटे काढण्याची संधी मुंबईकरांनी साधली.
मुसळधार पावसामुळे मी माझ्या घरी माझ्या बायकोसोबत अडकलो आहे, कृपया मदत करावी, असा संदेश एकाने पाठवून धमाल उडवून दिली. सर्वांकडील प्लॅस्टिक तपासण्याच्या नादात पूल तपासण्याचा महापालिकेला विसर पडला, असा चिमटा एकाने काढला. बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखवणाºयांनी आधी लोकल सेवा सुधारण्याची गरज आहे, असा सूरदेखील सोशल मीडियावरून व्यक्त करण्यात आला.

Web Title:  A humorous stream of social media and a rain of talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.