Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल वेळेवर लागणार,  शिक्षकांचे आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 10:44 IST

इयत्ता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन स्थगित झाले आहे.

मुंबई - इयत्ता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन स्थगित झाले आहे. आजपासून नियामक तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यात येणार आहेत. 9 एप्रिलला संध्याकाळी उशिरा शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची सकारात्मक बैठक झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी मंगळवारपासून ऑनलाइन जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील मागण्यांच्या बाबतीत निर्णय झाला असून शासनाने तसे पत्रकही संघटनेस दिले आहे.

बैठकीत नेमके काय ठरले?1. 2012 पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्ती मान्यता देण्यात येईल.2. कायम विना अनुदानितची मूल्यांकणास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाइन जाहीर करणे.3. १७१ वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदी साठी व अर्थ खात्याशी संबंधीत इतर मागण्यांसाठी  १७ एप्रिल २०१८ रोजी अर्थमंत्र्यांबरोबरच्या संयुक्त बैठकीत निर्णय करणे.''शिक्षणमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून व विद्यार्थी हितासाठी महासंघाने आंदोलन स्थगित केले असून आजपासून नियामक (मॉडरेटर्स)तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करतील. त्यामुळे  १२ वीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे'', अशी माहिती म.रा.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष  प्रा.अनिल देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :विद्यार्थीशिक्षक