पाण्याचे नियोजन कसे करावे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:05 AM2019-08-12T05:05:54+5:302019-08-12T05:06:03+5:30

मित्रांनो, गोड्या पाण्याचे महत्त्व आपल्याला माहीत आहे, यात शंकाच नाही.

How To Plan Water Store ... | पाण्याचे नियोजन कसे करावे...

पाण्याचे नियोजन कसे करावे...

googlenewsNext

- सोनाली कोलारकर- सोनार

मित्रांनो, गोड्या पाण्याचे महत्त्व आपल्याला माहीत आहे, यात शंकाच नाही. मध्यंतरी चिनू आणि त्याचे आई-बाबा राजस्थानला जाऊन आले. तिथली पाण्याची कमतरता बघून वाळवंटात पाणी कसं जपून वापरावं लागतं, हे चिनूला कळलं. घरी परत आल्यावर पावसाळा सुरू झाला आणि चिनूच्या गावाला इतका जोरदार पाऊस झाला की, चिनू आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी न्यायला सैनिककाका बोट घेऊन आले. गावात ज्या रस्त्याने चिनू बाबांसोबत बाइकवरून जायचा, त्या रस्त्याने चक्क आज तो बोटीतून जात होता. त्याला गंमत वाटली, पण नंतर घर दूरदूर जायला लागल्यावर रडू येऊ लागलं. एका मोठ्या कॅम्पमध्ये खूप जण बसले होते. तिथे प्यायचं पाणी ठेवलं होतं, पण अगदी मोजून सगळं दिलं जात होतं. रस्त्याने इतकं गोड पाणी वाहत होतं, पण ते पिण्यायोग्य नव्हतं. इतका पूर होता, पण प्यायला शुद्ध पाणी मिळत नव्हते.

खायला मिळत नव्हते. दोन दिवस पूर ओसरेपर्यंत सगळ्यांचे खूप हाल झाले. घरी परतल्यावर सगळी स्वच्छता करण्यात आठवडा निघून गेला. सगळे अगदी बिचारे झाले होते. मग सगळं सावरल्यावर चिनूने बाबांना विचारले की, इतकं पाणी होतं, पण आपल्याला त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे खूप पाणी असूनही काही फायदा नसतो का? चिनूचे बाबा खूप हसले आणि त्याला जवळ घेऊन म्हणाले, अरे कसं असतं, खूप पाऊस आला, तर काय करायचे, पूर आला तर काय करायचे, याचा सगळा विचार सगळ्या यंत्रणांनी करून ठेवलेला असतो. तशी योजना आखावी लागते. याला नियोजन असे म्हणतात. जर नियोजन करून ठेवल्यापेक्षाही अचानक जास्त विपरित काही घडलं, तर काय करायचं, याचाही विचार करून ठेवायचा असतो. याला आपत्ती नियोजन आणि निवारण म्हणतात. जिथे-जिथे असं नियोजन एकदम चोख असतं आणि लोकसहभाग पण चांगला असतो. तिथे संकटे आली, तरी फार गोंधळ उडत नाही.

व्यवस्थित पार पडत सगळे. जिथे नियोजन नसतं, तिथे त्रास होतो. पाण्याचं नियोजन पण म्हणूनच खूप काटेकोरपणे करावं लागतं. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आई बघ परीक्षेला जाताना तुला एक मोठी आणि एक छोटी पाण्याची बाटली देते शाळेत जाताना. एक छोटी बाटली संपली, तर ती भरता येते किंवा कोणा मित्राला पण गरज लागली पाण्याची तर तुला पण पाणी मिळेल आणि मित्राला पण म्हणून. तसंच अती पाण्यासाठी पण नियोजन करून ठेवाव लागतं. याचा चांगला अभ्यासक्रम पण असतो. शिकणार का मग नियोजनाचा अभ्यास? चिनूचे लाड करत बाबा म्हणाले. चिनूने मोठ्ठा होकार दिला. असं आहे तर! नुसतं पाणी असून उपयोगाच नाही! त्याचं योग्य नियोजन पण करायला हवं! चिनू म्हणाला. मित्रांनो, तुम्ही आता करणार ना असं नियोजन!
(लेखिका मुक्त पत्रकार आणि प्रकाशक आहेत.)
Sonalisk73@gmail.com

Web Title: How To Plan Water Store ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी