स्टेशनवरच्या हमालाला किती पैसे द्यायचे?; डिजिटल डिस्प्लेवर दिसणार दर; 'परे'चे महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 08:06 IST2025-02-01T08:06:52+5:302025-02-01T08:06:52+5:30

प्रवाशांना हमालीच्या दराबाबत अधिक स्पष्टता मिळत आहे.

How much to pay the porter at the station Rates displayed on digital display Important step of Western Railway | स्टेशनवरच्या हमालाला किती पैसे द्यायचे?; डिजिटल डिस्प्लेवर दिसणार दर; 'परे'चे महत्त्वाचे पाऊल

स्टेशनवरच्या हमालाला किती पैसे द्यायचे?; डिजिटल डिस्प्लेवर दिसणार दर; 'परे'चे महत्त्वाचे पाऊल

मुंबई : रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अधिक सुविधांसाठी पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबई सेंट्रल टर्मिनससह काही प्रमुख स्थानकांवर हमालांचे दर डिजिटल डिस्प्लेवर (टीव्ही) प्रदर्शित करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना हमाल सेवेसाठी अधिकचे पैसे देण्याची वेळ येणार नाही. हा उपक्रम हळूहळू सर्व रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर लावण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्ले स्क्रीनवर जाहिरातींसोबतच रेल्वेशी संबंधित महत्त्वाची माहितीही दाखवली जाते. सध्या या टीव्हीवर हमालांच्या सेवेसाठी अधिकृत दरपत्रक प्रदर्शित केले जात आहे. यामुळे प्रवाशांना हमालीच्या दराबाबत अधिक स्पष्टता मिळत आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्या हमालाने दरपत्रकापेक्षा अधिक शुल्क मागितले, तर प्रवाशांना लगेचच टीव्हीवरील अधिकृत दर दाखवता येतात. तसेच, ज्या प्रवाशांना हमालांकडून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे जाणवेल, ते अधिकृत तक्रार नोंदवू शकतात.
पारदर्शकतेसोबत कमाई टीव्हीवर जाहिराती दाखविण्यासाठी रेल्वे ५ वर्षांचा करार करते. या कराराच्या लायसन्स फीच्या स्वरूपात रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळतो.

उदाहरणार्थ, मुंबई सेंट्रल स्थानकावर ४४ डिजिटल डिस्प्ले स्क्रीन लावण्यात आले असून, या माध्यमातून रेल्वेला वार्षिक ४१ लाख रुपये तर पाच वर्षांमध्ये २ कोटी २० लाख रुपये महसूल मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेच्या सुमारे ११०० स्थानकांवर असे टीव्ही बसवण्यात आले असून, यासाठी २२०० चौरस फूट जागा वापरण्यात आली आहे.

Web Title: How much to pay the porter at the station Rates displayed on digital display Important step of Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.