Join us
Daily Top 2Weekly Top 5

होळीला रेल्वेची हाऊसफुल्ल सेवा, ४ दिवसांत २४ लाख प्रवाशांचा प्रवास; मुंबईतून मोठा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:58 IST

Holi 2026 Special Trains: होळी उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी रेल्वेने व्यापक व्यवस्था केली.

Holi 2026 Special Trains: होळी, शिमगा या सणांना वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. शेकडो अतिरिक्त ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. नियमित सेवांसह अतिरिक्त ट्रेनना प्रवाशांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. होळीच्या निमित्ताने सोडण्यात आलेल्या ट्रेनमधून २४ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

होळी सणाच्या चार दिवसांत मध्य रेल्वेद्वारे नियमित ट्रेनशिवाय सुमारे ८६२ होळी विशेष सेवा चालवल्या गेल्या. यामध्ये पूर्णपणे वातानुकूलित विशेष गाड्या, अनारक्षित विशेष गाड्या आणि देशभरातील विविध लोकप्रिय ठिकाणांसाठी वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असलेल्या इतर ट्रेनचा समावेश होता. महाराष्ट्रात ४०९ तर गोव्यात २१ विशेष ट्रेन चालवण्यात आल्या होत्या. 

होळीला रेल्वेची हाऊसफुल्ल सेवा, २४ लाख प्रवाशांचा प्रवास

होळीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीपासून ते ०२ मार्चपर्यंत मध्य रेल्वेच्या नियमित आणि विशेष ट्रेनमधून २४.१८ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये मुंबईहून सात लाख प्रवाशांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. देशभरातील प्रमुख ठिकाणांना जोडण्यासाठी या विशेष गाड्यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले होते. 

दरम्यान, होळी उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने व्यापक व्यवस्था केली. त्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पुणे इत्यादी प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी विशेष सोय, सुविधा करण्यात आल्या होत्या, असे सांगितले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Holi Rush: Indian Railways Carried 2.4 Million Passengers; Mumbai Sees High Demand

Web Summary : Indian Railways ran special trains for Holi, carrying 2.4 million passengers. Central Railway operated 862 special services, including fully AC trains. Mumbai accounted for seven lakh passengers. The railways arranged special facilities at major stations.
टॅग्स :होळी 2026भारतीय रेल्वेमध्य रेल्वेरेल्वेप्रवासीरेल्वे प्रवासी