‘टाटा’च्या मदतीने रुग्णालये कोरोनासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 01:17 IST2020-09-08T01:16:54+5:302020-09-08T01:17:00+5:30
चारही रुग्णालयात गंभीर आजारांवर संपूर्ण उपचारांची व्यवस्था उभारण्यात आली आहे.

‘टाटा’च्या मदतीने रुग्णालये कोरोनासाठी सज्ज
मुंबई : टाटा ट्रस्टने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन सरकारी रुग्णालयांत कोरोना उपचारांची अद्ययावत यंत्रणा उभी केली आहे. राज्यात सांगली येथे ५० खाटांचे, तर बुलढाणा येथे १०४ खाटांचे आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे १६८ खाटा व गोंडा येथे १२४ खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारी रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यात आले.
या चारही रुग्णालयात गंभीर आजारांवर संपूर्ण उपचारांची व्यवस्था उभारण्यात आली आहे.
ऑपरेशन थिअटर, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, डायलिसिससह रक्त साठवण्याच्या सुविधा, तसेच टेलिमेडिसीन युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.टाटा ट्रस्टने तयार केलेली रुग्णालये कोरोना रुग्णांबरोबरच इतर आजारांवरील रुग्णांच्या उपचारांकरिता आवश्यक त्या सुविधांसह सज्ज आहेत़ त्यामुळे रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळू शकेल़ तसेच मृत्युदरही कमी ठेवण्यात मदत होईल़