Join us

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:16 IST

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. काही मिनिटांतच सेन्सेक्सने 39 हजार निर्देशांकाचा टप्पा पार केला

मुंबई - नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असताना मुंबई शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 320 अंकांनी वाढला तर निर्देशांक 38, 993 स्थिरावला होता. हा सेन्सेक्सचा हा रेकॉर्ड मागील 29 ऑगस्ट 2018 च्या तुलनेत अधिक होता. त्यानंतर काही मिनिटांतच सेन्सेक्सने 39 हजार निर्देशांकाचा टप्पा पार केला. शेअर बाजारात पहिल्यांदाच सेन्सेक्सने हा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

तर दुसरीकडे निफ्टीनेही 11,700 निर्देशांकाचा टप्पा गाठला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये निफ्टी 10 हजार पर्यंत पोहचला होता. सोमवारी शेअर बाजारातल्या उसळीमुळे पीएसयू बँक, ऑटो आणि मेटल इंडेक्स यांचे शेअरचे भाव वधारले असून टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी घट झाला आहे.

या आठवड्यात आर्थिक घडामोडींबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात त्याचा परिणाम शेअर बाजारवर झालेला दिसू शकतो. आरबीआईची 2 एप्रिल रोजी बैठक होणार असून यामध्ये एमपीसीबाबत निर्णय होऊ शकतो. त्याचसोबत आरबीआयद्वारे व्याजदरातील रेपो रेटमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. याआधी 7 फेब्रुवारी रोजी रेपो रेटमध्ये 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांपर्यत घट करण्यात आली होती. तसेच भारतात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारात अनेक उलाढाली होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकनिफ्टीशेअर बाजार